चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
इब्राहिमपूर (ता चंदगड येथे शाळा प्रारंभ दिनी पट नोंदणी सर्वेक्षणामधील सर्व विद्यार्थी गावच्या केंद्रीय प्राथमिक शाळेमध्ये दाखल झाले. सर्व पालकांनी घेतलेला हा निर्णय जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांवरील समाजाचा विश्वास वृद्धिंगत होत असल्याचा सुखद पुरावा म्हणावा लागेल.
यावेळी सरपंच तुकाराम हरेर व ग्रामपंचायत सदस्य यांनी इयत्ता पहिलीच्या सर्व पालकांना त्याच्या मिळकतीचा चालू वर्षाचा घरफाळा व पाणीपट्टी मध्ये सूट देण्याचा अतिशय स्तुत्य असा निर्णय घेतलेला आहे. चंदगड तालुक्यामध्ये असा निर्णय घेणारी इब्राहिमपूर हि ग्रामपंचायत प्रथम ठरली आहे.
या नाविन्यपूर्ण निर्णयाबद्दल ग्रामपंचायतीचे कौतुक होत आहे. केंद्र शाळा इब्राहिमपूर या ठिकाणी आज इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा तसेच नवीन दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य व पुस्तके देवून स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमासाठी सरपंच तुकाराम हरेर माजी सरपंच निळकंठ देसाई, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य विनायक शिवणगेकर, सौ. सौदामिनी कांबळे, सौ. ज्योती खराडे त्याचबरोबर सर्व पालक, शाळेचे मुख्याध्यापक संजय कुंभार, गजानन बैनवाड, दत्तात्रय बाळू गावडे, विजय कृष्णा ढोणुक्षे आदि मान्यवर व विद्यार्थी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment