श्री रवळनाथ प्राथमिक विद्यामंदिरात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात - चंदगड लाईव्ह न्युज

22 June 2025

श्री रवळनाथ प्राथमिक विद्यामंदिरात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात

आजरा : सी एल वृत्तसेवा

        आजरा येथील जनता एज्युकेशन सोसायटी संचालित श्री. रवळनाथ प्राथमिक विद्यामंदिर मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन योग प्रात्यक्षिकांनी संपन्न झाला.

       प्रथमतः शाळेतील शिक्षक सुरज बिद्रे म्हणाले, ``योग्य व्यायाम आपल्या शारीरिक मानसिक स्वास्थ्यासाठी अत्यंत महत्वाचा असून त्यामुळे आपण निरोगी व सुदृढ राहू शकतो. त्यानंतर शाळेतील जेष्ठ अध्यापिका सौ. नीलांबरी कामत यांनी विद्यार्थ्यांना विविध आसने व प्रात्यक्षिके करून दाखवली व विद्यार्थ्यांकडून करून घेतली. या कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. उज्वला देसाई यांचे मार्गदर्शन लाभले तर शाळेतील शिक्षिका सौ. विजया पोतदार, कुमारी रविना घेवडे, श्रीमती पूजा लाड व शिक्षकेतर कर्मचारी पांडुरंग धडाम यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. रेश्मा कुराडे यांनी केले. विद्यार्थ्यानी उत्साहाने सर्व प्रात्यक्षिके केली.

No comments:

Post a Comment