कोल्हापूर / सी. एल. वृत्तसेवा
कोल्हापूरकर रहिवासी विकास सेवा संस्था नवी मुंबई व अंकुश सोनावणे मित्र मंडळ, ऐरोली नवी मुंबई या दोन्ही सामाजिक संस्थांच्या वतीने व चंदगड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार शिवाजीराव पाटील यांच्या प्रेरणेने राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीच्या निमित्ताने सोमवार दि. ३०/०६/२०२५ ते बुधवार दिनांक ०३/०७/२०२५ असे ४ दिवस कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील चंदगड, आजरा, गडहिंग्लज तालुक्यामधील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. त्यामध्ये चांगल्या प्रतीच्या स्कूल बॅग, वह्या, पेन, पेन्सिल, रबर, शॉपर्नर इ. वस्तुंचे वाटप करण्यात आले. मुंबईत राहूनही आपल्या मातीशी नाळ जोडलेली ठेवत गरजूंसाठी पुढाकार घेणे हेच कोल्हापूरकर संस्थेचे ब्रिद आहे.
या कार्यक्रमाची सुरुवात चंदगड तालुक्यातील सुळये (ता. चंदगड) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेपासून सुरुवात करण्यात आली. या ठिकाणी सर्वप्रथम राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून शाहू महाराज जयंती साजरी करण्यात आली.
या उपक्रमात चंदगडचे तहसीलदार राजेश चव्हाण, चंदगड पोलीस ठाणे स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वास पाटीलसाहेब, शिक्षणाधिकारी वैभव पाटील व नवी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाचे माजी सदस्य अंकुश सोनवणे, कोल्हापूरकर रहिवासी विकास सेवा संस्थेचे अध्यक्ष डी. एल. भादवणकर, सचिव प्रकाश तेजम, खजिनदार रणधीर पाटील, कार्याध्यक्ष विशाल पाटील, उपाध्यक्ष मारुती अर्दाळकर, सल्लागार मनोहर पाटील, अर्जुन पाटील, उपखजिनदार, अभिजीत पुजारी,
सदस्य योगेश मुळीक, उत्तम भादवणकर, विजय सुर्वे, सागर शेळके, शुभम भादवणकर आणि समाजसेवक अंकुश सोनवणे यांचे सहकारी मित्र मंडळी उपस्थित होते. तसेच या संपूर्ण कार्यक्रमांमध्ये माननीय आमदार शिवाजीराव पाटील यांचे खंदेसमर्थक पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी सहकार्य केले. या संपुर्ण शैक्षणिक उपक्रमाला संबंधित गावांमधील सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्ती कमिटी अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य, सदर शाळांमधील मुख्याध्यापक व इतर शिक्षक सहकारी आणि गावकऱ्यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले.
संस्थेचे कार्य केवळ शालेय साहित्य वाटपा पुरते मर्यादित नसून शिक्षण आरोग्य आणि सामाजिक विकास या तीन महत्त्वाच्या दिशेने सातत्याने पुढे चाललेले आहे.
No comments:
Post a Comment