राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत बागिलगे-डुक्करवाडी विद्यालय येथे हिवताप, डेंगू, चिकनगुनिया जनजागरण अभियान - चंदगड लाईव्ह न्युज

04 July 2025

राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत बागिलगे-डुक्करवाडी विद्यालय येथे हिवताप, डेंगू, चिकनगुनिया जनजागरण अभियान

 


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

    आयुष्मान भारत आरोग्य मंदिर माणगांव (ता. चंदगड) यांच्या वतीने बागीलगे डुक्करवाडी विद्यालय व जुनिअर कॉलेज येथे हिवताप जनजागरण मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत विद्यार्थ्यांना डेंगू, चिकनगुनिया, मलेरिया व हिवताप या रोगांबद्दल महत्त्वपूर्ण माहिती आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

        कार्यक्रमाची सुरुवात आर. जी. शिवणगेकर यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी कार्यक्रमाच्या उद्दिष्टांची माहिती दिली.

    आरोग्य सेवक पुंडलिक पाटील व आरोग्य सेविका सरिता नाईक यांनी पावसाळ्यात वाढणाऱ्या कीटकजन्य रोगांपासून संरक्षण करण्यासाठी खालील उपाययोजना सांगितल्या. घरात व आजूबाजूच्या परिसरात स्वच्छता ठेवणे, साचलेले पाणी काढून टाकणे, संध्याकाळी पूर्ण बाह्यांचे कपडे घालणे, डासांपासून संरक्षणासाठी जाळ्या, नेट्स वापरणे, ताप, अंगदुखी, थंडी-थरकाप अशा लक्षणांवर त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे.

        मुख्याध्यापक टी. व्ही. पाटील यांनी विद्यार्थ्यांना स्वतःच्या आरोग्याबाबत सतत जागरूक राहण्याचे महत्त्व सांगितले. व्यासपीठावर आरोग्य सेविका रेणुका कांबळे, अंजना कांबळे तसेच विद्यालयातील अन्य शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी एम. एन. शिवणगेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment