जय मल्हार क्रांती संघटनेच्या चंदगड तालुका अध्यक्षपदी सिताराम नाईक, अन्य पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर - चंदगड लाईव्ह न्युज

13 August 2025

जय मल्हार क्रांती संघटनेच्या चंदगड तालुका अध्यक्षपदी सिताराम नाईक, अन्य पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर

जय मल्हार क्रांती संघटनेच्या चंदगड तालुका व कोल्हापूर जिल्ह्यातील नवीन पदाधिकारी निवडीची पत्रे देताना मान्यवर

चंदगड : सी एल वृत्तसेवा 

       जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या राज्य कार्यकारणी ची बैठक नुकतीच आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक शासकीय स्मारक भिवडी तालुका पुरंदर, जिल्हा पुणे येथे संपन्न झाली. संघटनेचे संस्थापक व प्रदेश अध्यक्ष दौलत नाना शितोळे  अध्यक्षस्थानी होते. बैठकीत अंकुशराव जाधव, सुधीर नाईक (युवा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य), क्रांतिवीर उमाजी राजे नाईक यांचे थेट सातवे वंशज चंद्रकांतभाऊ खोमणे, संघटनेचे महाराष्ट्र राज्य युवा प्रवक्ता अमोल नाईक (कोवाड) आदी मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी संघटनेच्या चंदगड तालुका अध्यक्षपदी सिताराम नाईक (गुडेवाडी), युवा अध्यक्षपदी सुरज नाईक (वरगाव) व जिल्हा युवा अध्यक्षपदी अमर नाईक (हलकर्णी, ता. चंदगड) यांची बिनविरोध निवड झाली. त्यांना निवडीचे पत्र उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी जय मल्हार क्रांती संघटनेचे राज्यभरातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment