चंदगड : संजय गांधी निराधार योजनेचे १०० टक्के अर्ज मंजूर - अध्यक्ष लक्ष्मण गावडे, ३२३ लाभार्थ्यांना मिळाला आधार - चंदगड लाईव्ह न्युज

26 February 2026

चंदगड : संजय गांधी निराधार योजनेचे १०० टक्के अर्ज मंजूर - अध्यक्ष लक्ष्मण गावडे, ३२३ लाभार्थ्यांना मिळाला आधार

 

लक्ष्मण गावडे

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

    चंदगड तहसील कार्यालयात आयोजित विशेष बैठकीत संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत प्राप्त झालेल्या सर्व ३२३ अर्जांना संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण गावडे यांच्या पुढाकाराने मंजुरी देत तालुक्याने नवा इतिहास घडवला आहे. नायब तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत अर्जांची सविस्तर छाननी करून १०० टक्के अर्ज मंजूर करण्यात आले. या निर्णयामुळे चंदगड तालुक्यातील ३२३ लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असून शासनाच्या योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचविण्यात प्रशासनाला यश आले आहे.

    या समितीचे अध्यक्ष लक्ष्मण गावडे यांनी प्रत्येक अर्जाची कायदेशीर पडताळणी करूनच मंजुरी देण्यात आल्याचे सांगितले. तालुक्यातील निराधार, अपंग, विधवा व गरजू नागरिकांना शासनाच्या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच या योजनेचे अजून कोणी लाभार्थी असतील व ते लाभापासून वंचित असतील तर त्यांनी आपल्या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन श्री. गावडे यांनी केले आहे.

    या महत्त्वपूर्ण बैठकीस समितीचे सदस्य जोतिबा गोरल, महादेव सांबकर, वैजनाथ हुसेनकर, भरमु पाटील, महिला सदस्य भारती  जाधव यांच्या सह संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment