मराठी भाषा संवर्धनः तालुकास्तरीय स्पर्धांना प्रतिसाद, चंदगड तालुका मराठी अध्यापक संघाच्यावतीने आयोजन : निबंध, अभिवाचन व वक्तृत्व स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांचे यश - चंदगड लाईव्ह न्युज

25 February 2026

मराठी भाषा संवर्धनः तालुकास्तरीय स्पर्धांना प्रतिसाद, चंदगड तालुका मराठी अध्यापक संघाच्यावतीने आयोजन : निबंध, अभिवाचन व वक्तृत्व स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांचे यश

 


चंदगड / सी एल वृत्तसेवा

मराठी राजभाषा दिनाच्या औचित्याने चंदगड तालुका मराठी अध्यापक संघाच्या वतीने आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवडा अंतर्गत तालुकास्तरीय विविध स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मराठी भाषेवरील प्रेम, अभिव्यक्तीची ताकद व सृजनशील लेखनकौशल्य यांचे दर्शन घडवत विद्याथ्यांनी या स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले.

निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक निधी दिपक पाटील (दि न्यू इंग्लिश स्कूल, चंदगड), द्वितीय क्रमांक ऋतिका संतोष कुंभार (बी. डी. विद्यालय, बागिलगे), तृतीय क्रमांक श्रावणी दिपक पाटील (यशवंतराव चव्हाण हायस्कूल, सुरूते) यांनी पटकाविला. तर प्रगती आनंद सुरूतकर (राजगोळी खुर्द हायस्कूल, राजगोळी) हिला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात येणार आहे.

अभिवाचन स्पर्धेत प्रथम सई विठ्ठल सुतार (जनता विद्यालय, तुर्केवाडी), द्वितीय शौर्य शाहू पाटील (बी. डी. विद्यालय, बागिलगे), तृतीय देवयाणी तानाजी पाटील (राजर्षी शाहू विद्यालय, शिनोळी) यांनी यश संपादन केले. वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रांती मारुती पाटील (जनता विद्यालय, तुर्केवाडी), द्वितीय अनुष्का अनंत धोत्रे (धनंजय विद्यालय, नागनवाडी), तृतीय भारती भरमू पाटील (प्रा. नामदेवराव दुंडगेकर विद्यालय, मलतवाडी) यांनी उत्कृष्ट सादरीकरण करत पारितोषिके पटकाविली.

     या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांनी मराठी भाषेप्रती असलेली आपली निष्ठा, प्रेम व अभिव्यक्तीची ताकद सिद्ध करत तालुक्याचा नावलौकिक वाढविला आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

    या स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभगुरुवार, दि. २६ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आला असून, नागरिक, पालक, शिक्षक व विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विजेत्या विद्याथ्यर्थ्यांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन चंदगड तालुका मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष मोहन पाटील यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment