कालकुंद्री केंद्रशाळा जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत करणार चंदगड तालुक्याचे प्रतिनिधित्व - चंदगड लाईव्ह न्युज

28 December 2025

कालकुंद्री केंद्रशाळा जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत करणार चंदगड तालुक्याचे प्रतिनिधित्व

तालुकास्तरीय समूहगीत व समूह नृत्य स्पर्धेचे बक्षीस स्वीकारताना कालकुंद्री शाळेतील विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक

कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा 

       जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या मार्फत  नुकत्याच घेण्यात आलेल्या  चंदगड तालुकास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेतील कनिष्ठ गटात (इयत्ता पहिली ते चौथी) कालकुंद्री येथील केंद्रीय प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी अभूतपूर्व यश मिळवले.

       शासकीय सांस्कृतिक स्पर्धा सन २०२५-२६ मध्ये कालकुंद्री शाळा कनिष्ठ गट समूहगीत व समूहनृत्य या दोन्ही प्रकारात प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली. या यशामुळे उद्या दि. २९/१२/२०२५ रोजी कोल्हापूर येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेत शाळा चंदगड तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांच्या सहकार्याने जिल्हास्तरीय स्पर्धेची जय्यत तयारी विद्यार्थ्यांनी केली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये  परिणीता जोशी, सरोजा जोशी, विजया कांबळे, वैष्णवी मोरे, मधुमती पाटील, गायत्री गायकवाड, समर्थ सुतार, स्वरा मनवाडकर, आराध्या कोले, अनघा शेटजी, आर्या कोले, व्यंकटेश कांबळे, नयना पाटील, आर्या पाटील, आरोही कांबळे ह्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. 

     विद्यार्थ्यांना संगीत दिग्दर्शक अमर कांबळे, विठ्ठल कांबळे व देवेंद्र कांबळे  मुख्याध्यापक पुंडलिक गुरव, अध्यापक राजेश काटकर, सौ कोमल शेटजी, म्हात्रू गावडे, शिवाजी भरणकर, शाळा व्य. समिती अध्यक्ष दीपक कालकुंद्रीकर व सर्व सदस्यांचे मार्गदर्शन लाभले. जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी सरपंच सौ छाया जोशी उपसरपंच संभाजी पाटील सर्व सदस्य व ग्रामस्थांनी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.

   या कामी  चंदगडचे गट शिक्षणाधिकारी वैभव पाटील, विस्ताराधिकारी सौ सुमन सुभेदार, सांस्कृतिक विभाग प्रमुख तथा शिक्षण विस्तार अधिकारी सुनीत चंद्रमणी आदींचे प्रोत्साहन लाभले.

No comments:

Post a Comment