रामपूर येथील साहिल बाबुराव वरपे ठरला शासकीय रांगोळी स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचा मानकरी - चंदगड लाईव्ह न्युज

13 October 2026

रामपूर येथील साहिल बाबुराव वरपे ठरला शासकीय रांगोळी स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचा मानकरी

मान्यवरांच्या हस्ते प्रथम क्रमांक चे बक्षीस व प्रमाणपत्र स्वीकारताना साहिल वर्पे

चंदगड : सी एल वृत्तसेवा 

   महाराष्ट्र शासनाच्या सेवा संकल्प अभियान अंतर्गत संत गजानन महाराज इंजिनिअरिंग अँड मेडिकल कॉलेज महागांव (ता.गडहिंग्लज) अंतर्गत घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेत रामपूर येथील साहिल शारदा बाबुराव वर्पे हा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला.

   कु. साहिल हा बी.टेक.(ई.एन.टी.सी.) प्रथम वर्षाचा विद्यार्थी आहे. त्याला प्राचार्य डॉ. एस. एच. सावंत यांचे हस्ते प्रथम क्रमांकाचे सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्रक व रोख रक्कम देवून गौरविण्यात आले. यावेळी स्पर्धा संयोजक प्रा. ए. पी. नारायणकर आणि प्रा. एम. डी. खोत यांचेसह कॉलेजचे प्राद्यापक वर्ग, कर्मचारी वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याला इंजिनिअरिंग कॉलेज चे प्राद्यापक व प्राचार्य यांचे मार्गदर्शन लाभले. 

प्राथमिक शाळेपासून रांगोळी, चित्रकला, मुर्तीकाम व वक्तृत्व कलेची आवड जोपासणारा साहील वरपे ने आजवर या क्षेत्रात अनेक बक्षिसे मिळवली आहेत. विशेष म्हणजे कोणत्याही विशेष खाजगी क्लासेस शिवाय स्वयंउत्स्फुर्त जोपासलेली साहील ची कला विद्यार्थी वर्गाला प्रेरणादायी आहे. साहील हा बागिलगे शाळेचे उपक्रमशील शिक्षक बाबुराव वरपे यांचा चिरंजीव आहे. या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment