चंदगड / प्रतिनिधी
भारत मातेच्या स्वातंत्र्याचे पहिले जनक आद्यक्रांतीवरील राजे उमाजी नाईक यांच्या पुर्णाकृती पुतळा अनावरण कार्यक्रम माणगांव (ता. चंदगड) येथे 6 फेब्रुवारी 2019 रोजी दुपारी बारा वाजता होणार आहे.
यावेळी होणाऱ्या कार्यक्रमाचे उद्घाटन जय मल्हार क्रांती संघटनेचे राज्याचे अध्यक्ष लोकनेते दौलतनाना शितोळे यांच्या हस्ते होणार आहे. सामाजिक कार्यकर्ते शिवपुत्र महादेव पिटुक अध्यक्षस्थानी असतील. आमदार संध्यादेवी कुपेकर, गोकुळ व जिल्हा बँकेचे संचालक राजेश पाटील, माजी राज्यमंत्री भरमू पाटील, भाजपा कार्यकारणी सदस्य गोपाळराव पाटील, शिवसेना संघटक संग्रामदादा कुपेकर, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अप्पी पाटील, मंत्रालयातील अपर सचिव सुरेश नाईक यांच्या हस्ते दिपप्रज्वलन होणार आहे. वाल्मिकी फलकाचे पूजन ग्रामपंचायत सदस्य गुंडू मेटकुपी, नरवीर फलकाचे पूजन ग्रामपंचायत सदस्य बाळु नाईक, सिमदेव फलकाचे पूजन ग्रामपंचायत सदस्या सौ. पार्वती चिंचणगी यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाचे संयोजन नाईक समाजाच्या वतीने केले जाणार आहे. सर्वांनी कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन अध्यक्ष ईराप्पा पिटूक, उपाध्यक्ष आप्पाणा चिंचणगी, कार्याध्यक्ष मारुती मेटकर, खजिनदार सुरेश अरळीकट्टी, सचिव अर्जून पिटूक व सहसचिव मारुती चिंचणगी यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment