![]() |
खडीमशीन ना परवानगी देऊ नये याबाबतचे निवेदन तहसीलदार यांना देताना मांडेदुर्ग ग्रामस्थ. |
चंदगड / प्रतिनिधी
मांडेदुर्ग (ता. चंदगड) येथील खडीमशीनला परवानगी देऊ नये अशा आशयाचे निवेदन ग्रामस्थांनी तहसिलदार शिवाजी शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. गावापासून काही अंतरावर होणाऱ्या गाडी मशिनच्या आवाजाने नागरिकांना त्रास होण्याबरोबर घरांना तडे जाणार आहेत. या खडीमशीन ठिकाणापासून जवळच वन खात्याचे जंगल आहे. त्यामुळे झाडे व प्राण्यांनाही त्याचा त्रास होऊन पर्यावरणाची हानी होणार आहे. दहा-बारा वर्षापूर्वी याच परिसरात एक खडीमशीन होती. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला होता. 26 जानेवारी 2019 रोजी झालेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी खडीमशीनला तीव्र विरोध केला आहे. या खडीमशीनला परवानगी दिल्यास गावात कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे या खडीमशीनला परवानगी देऊ नये अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे तहसिलदार यांच्याकडे केली आहे. निवेदनावर प्रताप डसके, दत्तात्रय भोगण, विष्णू कांबळे, नाना डसके आदीसह ग्रामस्थांच्या सह्या आहेत.
No comments:
Post a Comment