जिल्हा स्तरावर कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवलेल्या गौळवाडी (ता. चंदगड) या शाळेतील कबड्डी संघ, सोबत मार्गदर्शक शिक्षक. |
गौळवाडी (ता. चंदगड) येथील येथील प्राथमिक शाळेतील मुलींच्या संघाने जिल्हा परिषद कोल्हापूर शिक्षण विभागाने घेतलेल्या अध्यक्ष चषक 2019 या क्रीडा स्पर्धेत प्राथमिक गटात प्रथम क्रमांक मिळवला. या संघाची राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. याच शाळेची विद्यार्थिनी कु. समृद्धी ओऊळकर हिने 50 मीटर धावणे मध्ये धावणे प्रकारात प्रथम क्रमांक मिळाला. तिचीही जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या संघात समृद्धी ओऊळकर, सुचिता ओऊळकर, शितल ओऊळकर, सलोनी ओऊळकर, श्रेया कलखांबकर, संचीता पाटील, मधुरा ओऊळकर, हर्षदा भोगुलकर, सानिका ओऊळकर या खेळाडूंचा समावेश आहे. यशस्वी खेळाडूंना शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अमृत बोकडे, मुख्याध्यापक विनोद कोरवी, अनिता चौगुले, शुभम ओऊळकर, प्रमोद ओऊळकर व विठोबा ओऊळकर यांचे मार्गदर्शन लाभले.
No comments:
Post a Comment