नॅशनल अबॅकस स्पर्धामध्ये अडकूरच्या गुरव कॉम्प्युटरचे उज्वल यश - चंदगड लाईव्ह न्युज

18 February 2019

नॅशनल अबॅकस स्पर्धामध्ये अडकूरच्या गुरव कॉम्प्युटरचे उज्वल यश

कोल्हापूर येथे झालेल्या विभागीय नॅशनल अबँकस स्पर्धामध्ये यश मिळवलेले विद्यार्थी, मार्गदर्शक राम गुरव  व महेश गुरव.
अडकूर / प्रतिनिधी
कोल्हापूर येथे झालेल्या नॅशनल अबॅकस स्पर्धामध्ये गुरव कॉम्प्युटर   इन्स्टिट्यूट अडकूर (ता. चंदगड)  ने उज्वल यश संपादन केले. या स्पर्धामध्ये विविध गटात ५५ गोल्ड मेडल तर ५O ट्राफी विद्यार्थ्यानी जिंकल्या. 2016 पासून गुरव कॉम्प्यूटरने नेसरी, कोवाड, शिनोळी, तुडये येथे जवळपास सातशे हे विद्यार्थ्यIना अबॅकसचे प्रशिक्षण दिले आहे. या विद्यार्थ्यांची मुंबई येथे होणाऱ्या नॅशनल स्पर्धासाठी निवड झाली आहे. याना गुरव कॉम्युटर्सचे राम गुरव, महेश गुरव, संदिप पाटील, किशोर पाटील, सरोजिनी गुरव, अजित गुरव, श्री. नेसरीकर यांचे मार्गदर्शन लाभले.


No comments:

Post a Comment