![]() |
किणी : रेशन धान्यात अशा प्रकारची प्राण्यांची विष्ठा व धुळ आहे. |
कोवाड / प्रतिनिधी
किणी (ता. चंदगड) येथे रेशन धान्य दुकानातून पक्षांची विष्ठा, पंख व धुळ मिश्रीत तांदूळ लाभार्थ्याना वितरीत केल्याने लोकांच्यातून संताप व्यक्त होत आहे. विष्ठा मिश्रीत तांदूळ परत करण्याऐवजी लोकाना वाटप केल्याने लोकानी नाराजी व्यक्त केली आहे. प्रकाश पुजारी यांनी धान्य पुरवठ्याची चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. दोन महिन्यातून सतत अशा प्रकारचा तांदूळ येत असल्याने आम्ही तरी काय करावं, असा प्रश्न उपस्थित करून रेशन दुकानदार प्रकाश पाटील यांनी जबाबदारी झटकली आहे. त्यामुळे रेशन धान्य पुरवठ्याची चौकशी व्हावी, अशी मागणी लोकांच्यातून होत आहे.
No comments:
Post a Comment