आज दिवसभर चंदगड बाजारपेठ बंद ठेवून शहिदांना श्रध्दांजली वाहण्यात आली. चंदगड पाठोपाठ कोवाड बाजार पेठही दिवसभर बंद होती. |
काश्मीरजवळील पुलवामा येथे आतंकवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्यात सीआरपीएफचे जवान शहिद झाले. या घटनेचे पडसाद देशात सर्वत्र उमटले. आज या घटनेच्या निषेधार्थ आज चंदगड तालुक्यात चंदगड, हलकर्णी फाटा, कोवाड यासह अन्य ठिकाणी आज दिवसभर कडकडीत बंद पाळून शहिदांना आदरांजली वाहण्यात आली. व्यापारी वर्गानेही बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्यान चंदगड तालुक्यातील प्रमुख बाजारपेठामध्ये आज दिवसभर शुकशुकाट होता.
चंदगड येथील संभाजी चौकात काल सायंकाळी नागरीकांनी एकत्र येवून गावातून फेरी काढून पाकिस्तान मुर्दाबाद, शहिद जवान अमर रहे, भारत माता की जय च्या घोषणा देत फेरी काढून श्रध्दांजली वाहण्यात आली होती. यासह अन्य ठिकाणी फेरी काढून पाकिस्तान विरोधी घोषणा देऊन या हल्याचा बदला घेण्याच्या भावना नागरीकांनी यावेळी व्यक्त केल्या.
यासह चंदगड येथील मुस्लीम युवक प्रवाशी वाहतुक संघटना व हिंदू समाजातील नागरीकांच्या वतीने संभाजी चौकात एकत्र येवून आझादनगर, कुंभारगल्ली, रवळनाथ गल्ली, नवीन वसाहतमार्गे संभाजी चौकात जमले. यावेळी पाकीस्तानचा पुतळा व ध्वजाची होळी करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी दहशतवाद्यांच्या विरोधात संतप्त भावना व्यक्त केल्या. यावेळी अमर रहे अमर रहे शहिद जवान अमर रहे, जला दो जला दो पाकिस्तान जला दो अशा घोषणा देण्यात आल्या.
पुलवामा हल्याच्या निषेधार्थ कोवाड़ येथे हिंदू व मुस्लिम बांधवाकड़ून निषेध फेरी व शोक सभा
कोवाड / प्रतिनिधी
14 फेब्रुवारी 2019 रोजी अवंतीपुरा पुलवामा येथे भारतीय सैन्यावर अतिरेक्याकड़ून झालेल्या भ्याड हल्याच्या निषेधार्थ कोवाड (ता.चंदगड) येथे सर्व हिंदु व मुस्लिम बांधवाच्या वतीने निषेध फेरी काढून संताप व्यक्त करण्यात आला. शिवाजी पूतळ्यापासून निषेध फेरीला सुरुवात झाला. पूर्ण गावातुन काढण्यात आलेल्या निषेध फेरीमध्ये गावातील सर्व हिंदु-मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुर्गामाता मंदिर जवळ उपस्थित सर्व बांधवकड़ूंन प्रथमतः दोन मिनिटे स्तब्धता पाळून हल्यात शहीद झालेल्या सर्व सैनिकाना श्रध्दांजली वाहून शोकसभा घेण्यात आली. त्यानंतर संतप्त झालेल्या देश बांधवाच्या कडून पाकीस्तानचा ध्वज जाळण्यात आला व पाकिस्तान विरोधी घोषणा देण्यात आल्या. कोवाड़ बाजार पेठ पूर्णपणे बंद ठेवून सर्वांनी शोक व्यक्त केला व आदरांजली वाहिली.
यावेळी जि. प. सदस्य कल्लापा भोगन, उपसरपंच विष्णु आडाव, रणजीत भातकांडे, दयानंद सलाम, राजू हल्याली, श्यामराव पाटील, विनायक पाटेकर, माजी उपसरपंच चंद्रकांत कुंभार, विजय वांद्रे, शिवानंद गणाचारी, विनायक पाटील, सुधीर जाधव, दिपक कोरी, मुरारी सुर्वे, काशिनाथ जाधव यांच्यासह आदम मुल्ला, दस्तगीर शेख, राजेसाब मुल्ला, बाबासाहेब मुल्ला, नुर मुल्ला, आबिद मंगसुळी, इम्तियाज आल्ला खान, दस्तगीर आल्ला खान, राजु आत्तार, वासिम, गणेशवाडी, इसाक मुल्ला, महाबुब मुल्ला, राजु मुल्ला, फारुख शेख, समिऊलला शेख, साहील शेख, हुसेन दुब्बाल, मुबारक शेख यांच्यासह बहुसंख्य मुस्लीम बांधव उपस्थित होते. त्याबरोबरच चंदगड़ तालुका पत्रकार संघाचे कोवाड़ विभागातील सर्व पत्रकार सदस्य उपस्थित होते.
हेरे (ता. चंदगड) येथेही शिवसेनेच्या वतीने काश्मीर मधील पुलवामा येथे भारतीय सैनिकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आज हेरा पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी हेरे येथे पाकिस्तानचा ध्वज जाळून, चपलांचा हार घालून व पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देऊन पाकिस्तानचा निषेध करण्यात आला. यावेळी अड. संतोष मळविकर, सुशील दळवी, प्रकाश गावडे, कमलाकर तेलंग, संदीप मोरे, बाळकु बांदेकर, सुरेंद्र गावडे, ज्ञानेश्वर गावडे, रामा जांबरेकर, सुरज गावडे, सुभाष जाधव, बाबू शिंदे, रामजी कांबळे, तसेच हेरा पंचक्रोशीतील शिवसैनिक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment