खासदार उदयनराजे भोसले |
छत्रपती शिवाजी महाराजांचे 13 वे वंशज खासदार उदयनराजे भोसले हे चंदगड तालूक्यात प्रथमच येत असल्याने तालुकावासियांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात येणार आहे. चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयाच्या मैदानावर रविवार 17 फेब्रुवारी 19 रोजी सायंकाळी 4 वाजता होणाऱ्या कार्यक्रमात खासदार उदयनराजे भोसले यांचा सत्कार आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी चांदीची तलवर भेट देण्यात येणार आहे.
यावेळी खासदार श्री. भोसले यांच्या हस्ते डॉ. प्रकाश बांदिवडेकर युवा फौडेशनच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. यानिमित्त चंदगड मॅरेथॉन, नेत्र तपासणी शिबीर, मोफत चष्मे वाटप, अपंगाना व्हिलचेअर जयपूर फूटांचे वाटप, तालुक्यातील शहिद जवानांच्या कूटूंबीयांचा सन्मान, महिलांना साड्या वाटप करणेत येणार आहेत. या कार्यक्रमाला माजी आमदार श्रीपतराव शिंदे, डॉ. प्रकाश बांदिवडेकर, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार, जि. प. सदस्य अमर पाटील यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. सांयकाळी महाराष्ट्र कलादर्पण या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करणेत आले आहे. या कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित रहावे असे
आवाहन सत्कार समितीचे निमंत्रक विश्वजित दिगंबरे, सत्कार समितीचे अमर किरदत्त,शितल भिवटे,शंकर पाटील, डॉ. नामदेव निटूरकर यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment