![]() |
संत गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमावेळी नूतन नगराध्यक्षा सौ. प्राची काणेकर यांच्या सत्कार प्रसंगी उपस्थित तालुक्यातील परीट समाजबांधव. |
चंदगड तालुका परीट समाज मार्फत नुकताच रामलिंग मंदिर येथे संत गाडगेबाबा महाराज यांची जयंती पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूतन नगराध्यक्ष सौ. प्राची काणेकर या होत्या.
सकाळच्या पहिल्या सत्रामध्ये चंदगड येथील संभाजी चौक ते रवळनाथ मंदिर हा परिसर सर्व परीट समाज व गावातील मंडळी या दोन्ही बाजूने गटार व रस्ता साफसफाई करण्यात आली. त्यानंतर गावातील सर्व कार्यकर्ते रामलिंग मंदिर समोरील कमळ तलाव साफ करण्यात आला. त्यानंतर महिलांनी तलावाचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. "लोकांना विश्वासात घेऊन नगरपंचायतचा कारभार प्रामाणिकपणे करेन, श्री संत गाडगे महाराज यांचा संदेश स्वच्छतेकडून समृद्धीकडे जाण्याचा आहे, तो संकल्प नगरपंचायत कडे राहील. तसेच रामलिंग मंदिर मंदिर समोरील तळी बांधण्याचा संकल्प असून मी व माझे सहकारी यांच्या सहकार्यातून तू पूर्ण करेन" असे नगराध्यक्षा सौ. काणेकर यांनी सांगितले.
शासकीय तंत्रनिकेतन विद्यालया कोल्हापूरचे दत्तात्रय गर्गे यांनी संत गाडगे महाराज यांच्या बद्दल मार्गदर्शन केले. परीट समाजाचे नेते नारायण रसाळ यांनी समाजामध्ये एकजूट होण्याबद्दल मार्गदर्शन केले. त्यानंतर जिल्हा सचिव अभिजीत सांगावकर यांनी समाजातील लोकांच्या समस्या बद्दल आढावा घेतला. तसेच जिल्हाध्यक्ष आनंद शिंदे यांनी समाजाबद्दल विचार मांडले. महाराष्ट्र राज्य परीट समाजाचे उपाध्यक्ष सागर परीट त्याने समाजाबद्दल व गाडगे महाराज यांच्या बद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमावेळी रामचंद्र परीट, नवनिर्वाचित नगरसेवक ,नगरसेविका यांचा सत्कार करण्यात आला. परीट समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार या वेळी झाला. कार्यक्रमाला चंदगड तालुका परीट समाज औदुंबर मोरे, मनोज परीट, दशरथ यादव, सतीश परीट, अनिल जाधव, संजय परीट, रमेश यादव, पांडुरंग परीट, शिवाजी परीट, अर्जुन परीट, दयानंद परीट नवनाथ परीट, संतोष सुर्यवंशी, डॉक्टर विठ्ठल परीट, बाबू परीट,चंद्रकांत परीट ,सुरज परीट राहुल नांदुरकर, ओमकार बांदेकर, शिवाजी लोकळे, प्रसाद करपे, प्रकाश परीट, इत्यादी उपस्थित होते. माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र परीट यांनी प्रास्ताविक केली. पंकज परीट यांनी सूत्रसंचालन केले. राजाराम परीट यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment