![]() |
एकनाथ हरीबा साळुंखे |
गाडीवरील ताबा सुटून गाडी रस्त्याच्या बाजुला असलेल्या झाडाला धडकल्याने एकनाथ हरीबा साळुंखे (वय-49, सद्या पाटणे फाटा, मुळ रा. अंबेजोगाई, जि. बीड) यांचा जागीच मृत्यू झाला. मंगळवारी रात्री साडेदहा वाजता हा अपघात झाला. इंदु युवराज पवार वय-30 (रा. वाघाळा कारखाना आंबेजोगाई बीड सद्या तुर्केवाडी, ता. चंदगड) यांनी याबाबतची वर्दी चंदगड पोलिसात दिली आहे.
यासंदर्भात माहीती अशी – एकनाथ साळंखे हे आपल्या बुलेट दुचाकीने मंगळवारी रात्री जंगमहट्टी रोडने पाटणे फाटा येथे येत होते. पाटणे फाट्यापासून काही अंतरावर असलेल्या मेगा फॅक्टरीसमोर भरधाव वेगाने असलेलया गाडीवरील ताबा सुटल्याने बुलेटने समोरील झाडाला जोराची धडक दिली. यामध्ये त्यांचा अपघात होवून त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पाटणे पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्यांची घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहीती घेवून मृतदेह शवविच्छेदनासाठी चंदगड येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. साळुंखे हे पाटणे फाटा येथे धावड व्यावसाय करत होते. त्याच्या मृत्यूने घरातील कर्ता पुरुष गेल्याने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची नोंद चंदगड पोलिसात झाली असून पोलिस नाईक विश्वाजित गाडवे तपास करत आहेत.
No comments:
Post a Comment