पंच कमिटीने विकासाचा मास्टरप्लॅन तयार करावा - आमदार राजेश पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

22 February 2021

पंच कमिटीने विकासाचा मास्टरप्लॅन तयार करावा - आमदार राजेश पाटील

तालुका महाआवास अभियान कार्यशाळा संपन्न 



चंदगड/प्रतिनिधी

गावचा विकास  होण्यासाठी पंच कमिटीने विकासाचा मास्टरप्लॅन तयार करावा. रस्ते गटारी झाली म्हणजेच विकास होत नाही.प्रथम गावात पिण्याचे पाणी,आरोग्य शौचालय सेवा पुरवली तर  विकासाची सुरुवात होते. गटातटातील भांडणे  सोडवणे हे काम पाच वर्षे न करता विधायक कामे करा असे आवाहन आम राजेश पाटील यांनी केले.

 ते चंदगड येथे महाआवास योजना  ग्रामीण अभियान   कार्यशाळेत बोलत होते अध्यक्षस्थानी सभापतीअँड अनंत कांबळे होते. प्रमुख पाहुणे तहसीलदार विनोद रणवरे,जि प सदस्य सचिन बल्लाळ, उपसभापती मनिषा शिवनगेकर, विठाबाई मूरकूटे उपस्थित होते.


प्रास्ताविक गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे यानी करून योजनेचा उद्देश स्पष्ट केला.


आम.पाटील पुढे म्हणाले महाआवास अभियान ग्रामीण राबविण्याचे उद्देश म्हणजे ग्रामीण गृहनिर्माण योजना मध्ये शासकीय यंत्रणेबरोबरच समाजातील सर्व घटक त्यांचा सक्रिय सहभाग वाढवणे ग्रामीण क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून घरांचा दर्जा व गुणवत्ता वाढवणे याबाबत जनजागृती करून ग्रामीण गृहनिर्माण योजना अंतर्गत गरजूंना पात्र परंतु घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध नसल्यास लाभार्थ्यांना पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना अशा विविध योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांना मिळून घरकुल योजनेचा लाभ मिळावा यासाठी आमचे प्रयत्न असतील यामध्ये ग्रामपंचायत स्तरावर नागरिकांना सरपंच ग्रामसेवक यांनीही सहकार्य करण्याची गरज असल्याचे आम .श्री पाटील बोलताना म्हणाले.यावेळी सभापती अँड अनंत कांबळे,विजवितरण चे प्रभारी कार्यकारी अभियंता संजय पवार  यांनीही मनोगत व्यक्त केले.यावेळी विस्तार अधिकारी अमृता देशपांडे, सरपंच आर जी पाटील, अरूण पाटील,संजय चंदगडकर, डी जी नाईक, माधुरी सावंत, स्वप्नाली गवस, श्रीधर भोगण, रजत हूलजी,धैर्यशील यादव आदीसह सरपंच, सदस्य ग्रामसेवक, तलाठी उपस्थित होते. सूत्रसंचालन सदानंद पाटील यानी केले.आभार कृषी अधिकारी संतोष जाधव यांनी मानले .




No comments:

Post a Comment