अडकूर विकास सेवा संस्थेतील १ कोटी ४६ लाखांच्या अपहाराप्रकरणी न्यायालयात दावे ठोकण्याचा आदेश - चंदगड लाईव्ह न्युज

22 February 2021

अडकूर विकास सेवा संस्थेतील १ कोटी ४६ लाखांच्या अपहाराप्रकरणी न्यायालयात दावे ठोकण्याचा आदेश



अडकूर -सी .एल. वृत्तसेवा

थील विकास सेवा संस्था मर्या . अडकूर या सेवा संस्थेत सन २०१७ते २०१८या कालावधित १ कोटी ४६ लाख ५४९७ रूपयांचा अपहार झाल्याचे लेखापरिक्षणामध्ये स्पष्ठ झाले होते . या संदर्भात 

चंदगडचे सहा . निबंधक कृष्णा ठाकरे यानी अपहारामध्ये सहभागी असणाऱ्या आजी माजी संचालक , आजी - माजी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ९१ ( १ ) नुसार कारवाई करण्याचा आदेश दिल्याने अडकूर परिसरातील संबंधितांचे धाबे दणाणले आहेत .

            प्रमाणित लेखा परिक्षक एन .जे. सरनोबत यानी दि .१ .४ .२०१७ ते दि .३१ .३ .१८ या कालावधीचे संस्थेचे लेखापरिक्षण कले होते . यावेळी सेवा सोसायटीत १४६०५४९७ रूपये इतका प्रचंड गैरव्यवहार झाल्याचे निदर्शनास आले होते . यामध्ये बोगस कर्ज नावे टाकून व रोख शिल्लख कमी दाखवून ५०९४८५० लाखांचा अपहार तसेच खोटे रेकॉर्ड तयार करून ६७ लाखांचा व यादी फरकाची रक्कम येणे दाखवून २८१०६४७ इतक्या रकमांचा अपहार केल्याचे स्पष्ट होत आहे . त्यामूळे या अपहारास जबाबदार असणाऱ्या सर्वावर कलम ८८ नुसार कारवाई करून संबधीता कडून रक्कम वसूल करण्याचे आदेश निबंधकानी दिले आहेत . तसेच याकामी सनदी लेखा परिक्षक रघूनाथ गणेशाचार्या यांची नेमणूक करून चौकशीचे आदेश दिले आहेत . त्यामुळे सेवा सोसायटीच्या सर्व आजी -माजी संचालक , अधिकारी व कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत .





No comments:

Post a Comment