मलगड येथील शर्विल घोळशे याची आय आय टी दिल्ली येथे फिजिक्स इंजीनियरिंग साठी निवड - चंदगड लाईव्ह न्युज

07 July 2025

मलगड येथील शर्विल घोळशे याची आय आय टी दिल्ली येथे फिजिक्स इंजीनियरिंग साठी निवड

 

शर्विल घोळसे व त्याच्या आई-वडिलांचा सत्कार करताना प्राथमिक शिक्षक संघाचे पदाधिकारी.

चंदगड : सी एल वृत्तसेवा 

       मलगड (ता. चंदगड) येथील कु. शर्विल संजय घोळसे याची आय आय टी नवी दिल्ली येथे फिजिक्स इंजीनियरिंग साठी निवड झाली आहे. मलगड सारख्या छोट्या गावातील जिल्हा परिषदेच्या एक शिक्षकी शाळेत प्राथमिक शिक्षण घेतलेल्या शर्विलची शैक्षणिक क्षेत्रातील ही उत्तुंग भरारी चंदगड तालुका व कोल्हापूर जिल्ह्यासाठी अभिमानास्पद ठरणारी आहे. शर्विल हा प्राथमिक शिक्षक संघाचे (शिवाजीराव पाटील गट) प्रवक्ते, श्री देव वैजनाथ शिक्षक पतसंस्थेचे संचालक व ज्ञानकुंभ शैक्षणिक व्यासपीठ चे अध्यक्ष संजय घोळसे यांचा चिरंजीव आहे.

      या यशाबद्दल शर्विल घोळसे याचे व त्यांच्या पालकांचे प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने त्यांच्या निवासस्थानी जाऊन अभिनंदन करण्यात आले. यावेळी शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष शिवाजी पाटील, निवृत्त केंद्रप्रमुख शामराव पाटील व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment