मुंबई पोलीस दलातील निवृत्त पीएसआय मारुती पाटील यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

07 July 2025

मुंबई पोलीस दलातील निवृत्त पीएसआय मारुती पाटील यांचे निधन

  

मारुती पाटील

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा 

         मुंबई पोलीस दलातील सेवानिवृत्त पीएसआय मारुती नीलकंठ पाटील, वय ७५ (मुळगाव कालकुंद्री, ता. चंदगड) सध्या राहणार नाझर कॅम्प, येळ्ळूर रोड, वडगाव- बेळगाव यांचे सोमवार दि. ७/७/२०२५ रोजी सायंकाळी वडगाव येथे राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात विवाहित मुलगा, सून, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. दैनिक पुढारी चे पत्रकार व चंदगड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष श्रीकांत पाटील (कालकुंद्री) यांचे ते काका होत. त्यांच्या पार्थिव देहावर उद्या दि. ८ सकाळी वडगाव स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment