नांदवडे येथील श्री भावेश्वरी विद्यालयात शालेय मंत्रिमंडळ निवडणूक उत्साहात - चंदगड लाईव्ह न्युज

28 June 2025

नांदवडे येथील श्री भावेश्वरी विद्यालयात शालेय मंत्रिमंडळ निवडणूक उत्साहात


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        नांदवडे (ता. चंदगड) श्री भावेश्वरी विद्यालयामध्ये शालेय मंत्रिमंडळ निवडणूक मोठ्या उत्साहात पार पडली. या निवडणुकीसाठी गुप्त मतदान पद्धतीचा अवलंब करण्यात आला. विद्यार्थ्यांनी लोकशाही प्रक्रियेचा अनुभव घेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

        या निवडणुकीत निवडणूक अधिकारी म्हणून पी. एम. कांबळे, सौ. कोरवी व डी. जी. पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन व मार्गदर्शन शाळेचे मुख्याध्यापक यू. एल. पवार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्यांची जाणीव निर्माण करणारा हा उपक्रम यशस्वी ठरला.

No comments:

Post a Comment