माणगाव येथे 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान' शिबीराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद - चंदगड लाईव्ह न्युज

27 June 2025

माणगाव येथे 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान' शिबीराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        चंदगड तहसीलदार राजेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आज माणगाव (ता. चंदगड) येथे आयोजित 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान' शिबीराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी आमदार शिवाजीराव पाटील प्रमुख उपस्थित होते. 

               

        आमदार पाटील म्हणाले, ``ग्रामस्थांना एकाच छताखाली अनेक महत्त्वाच्या शासकीय योजनांचा लाभ, दाखल्यांचे वाटप, शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, घरकुल योजनेचा लाभ देण्यात आला. पाऊस आणि शेतीच्या कामांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना विविध प्रकारच्या शासकीय योजनांचा लाभ मिळवणे, दाखले काढणे जिकिरीचे झाले आहे. परंतु या उपक्रमामुळे खऱ्या अर्थाने 'शासन आपल्या दारी' ही संकल्पना साकार होत आहे. हा स्तुत्य उपक्रम मोठ्या प्रभावीपणे राबविल्याबद्दल तहसीलदार राजेश पाटील व सर्व विभागांचे शासकीय कर्मचारी वर्ग आणि त्यांच्या टिमचे अभिनंदन केले. चंदगड विधानसभा मतदारसंघात ग्रामीण भाग जास्त आहे. त्यामुळे सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी लोकांना समजून घेऊन सहकार्याची भावना ठेवून काम करावे अशी सूचना केली.`` 

      यावेळी माजी राज्यमंत्री भरमुआण्णा पाटील, चंदगडचे तहसीलदार राजेश चव्हाण, गटविकास अधिकारी सौ. वृषाली यादव,  माणगाव गावच्या सरपंच सौ. रेणुका नरी, माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष पृथ्वीराज देसाई,  दिग्वीजय देसाई, अनिल शिवणगेकर तसेच माणगाव व परिसरातील ग्रांमस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment