नांदवडे येथील श्री भावेश्वरी विद्यालयात राजर्षी शाहू जयंती उत्साहात साजरी - चंदगड लाईव्ह न्युज

27 June 2025

नांदवडे येथील श्री भावेश्वरी विद्यालयात राजर्षी शाहू जयंती उत्साहात साजरी

श्री भावेश्वरी विद्यालयात राजर्षी शाहू जयंती कार्यक्रमात बोलताना मुख्याध्यापक यु. एल. पवार

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        श्री भावेश्वरी विद्यालय नांदवडे (ता. चंदगड) येथे छत्रपती शाहू जयंती व सामाजिक न्याय दिन विद्यालयाचे मुख्याध्यापक यु. एल. पवार यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. पवार यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवन चरित्राचा आढावा घेतला. त्यांच्या जीवनातील वेगवेगळे प्रसंग सांगून ते फक्तच राजे नव्हते तर द्रष्टे समाजसुधारक होते हे पटवून दिले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शाहू महाराजांच्या जीवनावर अनुजा पाटील, रचना मळवेकर, स्मितल गावडे, स्नेहल गावडे, कार्तिकी पाटील, प्रतीक जरंबेकर, दीप्ती शिंदे यांनी आपली मनोगत व्यक्त केली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे ज्येष्ठ अध्यापक पी. एम. कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन सौ. कोरवी यांनी तर आभार डी. जी. पाटील यांनी मांडले.

No comments:

Post a Comment