स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कोवाड शाखेत बँकेच्या ७० व्या स्थापना दिवसानिमित्त मान्यवरांच्या हस्ते केक कापून शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
देशातील अग्रगण्य असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेचा ७० वा स्थापना दिवस २५ जून २०२५ रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. स्टेट बँक ऑफ इंडिया च्या कोवाड तालुका चंदगड येथील शाखेत शाखाधिकारी आशिष रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापना दिवस साजरा करण्यात आला. सायंकाळी पोवाडा बाजारपेठेतील व्यापारी वर्ग विविध पतसंस्था व बँकांचे अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत केक कापून आनंद व्यक्त करण्यात आला. यावेळी उपस्थित बँकेचे अधिकारी, कर्मचारी, ग्राहक व कोवाड येथील व्यापारी वर्ग
शाखाधिकारी आशिष रोकडे यांनी प्रास्ताविक केले. कॅशियर दीपक जाधव व क्लार्क ज्ञानेश्वर बिर्जे यांनी स्वागत केले. यावेळी कोवाड मर्चंट पतसंस्थेचे मॅनेजर पुंडलिक पाटील, कॅशियर मनोहर पाटील, राणी स्टेशनरीचे मालक रमेश पाटील, दक्ष कलेक्शनचे मालक पी. के. गायकवाड, आय केअर ऑप्टिकलचे मालक पाटील, माजी सैनिक तानाजी कोकितकर, डोंगरे फर्निचर्स चे मालक रमेश डोंगरे, दक्षता लॅबचे रवी तोगले, चंदगड अर्बन बँकेचे शाखाधिकारी व कर्मचारी तसेच बाजारपेठेतील विविध फार्मचे मालक व ग्राहक उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सिक्युरिटी शंकर पाटील तसेच बँक कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment