कोवाड : सी. एल. वृत्तसेवा
चंदगड तालुक्यातील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांची माहिती संकलन कार्यशाळा केंद्रीय प्राथमिक शाळा कोवाड येथे नुकतीच संपन्न झाली. चंदगड तालुका सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी संघटनेचे तालुका अध्यक्ष शि. ल. होणगेकर हे होते.
सेवानिवृत्त झालेल्या प्राथमिक शिक्षकांची अनेक प्रकारची माहिती प्रशासनाकडून वेळोवेळी अचानकपणे मागितली जाते. अशी माहिती तात्काळ देणे वयोवृद्ध शिक्षक तसेच कुटुंब निवृत्ती वेतन धारक महिला देऊ शकत नाहीत. यासाठी सर्व शिक्षकांचा एकत्रित डाटा संगणकात एकत्रित करून ठेवण्यासाठी तालुक्यात ठीक ठिकाणी अशा कार्यशाळांचे आयोजन करून सर्व प्रकारचा डाटा संकलित करण्यात आला. असे करणारा चंदगड हा जिल्ह्यातील पहिलाच तालुका ठरला आहे.
तालुक्यातील संगणक तज्ञ प्राथमिक शिक्षक आप्पाराव पाटील यांनी याबाबतची संकल्पना मांडल्यानंतर विरंगुळा केंद्राचे अध्यक्ष वसंतराव जोशीलकर यांनी ही संकल्पना प्रत्यक्षात अंमलात आणायचे ठरवले. याकरिता गेल्या पंधरा दिवसात चंदगड, कार्वे, नागनवाडी आदी ठिकाणी संघटनेच्या वतीने सेवानिवृत्ती वेतनधारक व कुटुंब निवृत्ती वेतन धारकांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
कोवाड येथील कार्यशाळेत प्रास्ताविक करताना वसंत जोशीलकर यांनी डाटा संकलनाची गरज विशद करून तसेच ६८ मुद्यांचा फॉर्म कसा भरावा याबद्दलचे मार्गदर्शन केले. यावेळी माजी विस्ताराधिकारी एन. व्ही. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी वयाची पंचाहत्तरी पूर्ण केलेले केंद्रप्रमुख अनंत जोशिलकर, माजी मुख्याध्यपक सु. ग. पाटील, शिवाजी रु. देवण, शिवाजी कडोलकर यांचा सत्कार करण्यात आला.
या वर्षात सेवानिवृत्त झालेले विस्तार अधिकारी एन. व्ही. पाटील, अध्यापक प्रभाकर रजगोलकर, शंकर कोरी, मधुकर कोकितकर, अशोक हन्नुरकर, क. पा. पाटील, सुखदेव भातकांडे, नामदेव कोले, शावेर फर्नांडीस, रमेश पाटील, राजाराम गावडे आदी शिक्षक सभासदांचे संघटनेत पत्रकार संघाचे अध्यक्ष श्रीकांत पाटील, गु. म्हा. पाटील, अनंत मुळीक, डी. आय. पाटील, लक्ष्मण बामणे, आर आर पाटील , वाय. आर. निट्टूरकर, बी. एम. पाटील, यशवंत कांबळे, शिवाजी नार्वेकर यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. फॅमिली पेन्शन धारक पुष्पा पाटील, सुनीता वसंत पाटील, शांता सुभाष पोतदार, सुमन पाटील यांचे स्वागत सौ सुनिता राजगोळकर यानी केले.
अध्यक्ष भाषणात शि. ल. होनगेकर यांनी संघटनेच्या कार्याचा आढावा घेतला. वसंत चांदीलकर यांनी आभार मानले. कार्यशाळेसाठी सुधीर मुतकेकर, स. द. पाटील, ल. स. नाईक, श्रीकांत शि. पाटील, विजय पाटील, प्रल्हाद देसाई, आण्णापा वांद्रे, प. सो. हुंडळेवाडकर, बाळासाहेब कालकुंद्रीकर, य. ल. कांबळे, ल. सा. जोशी, डी. आर. पाटील, डी. आय. पाटील, मा. क. भोगण, विठ्ठल राजगोळकर, शं. का. पाटील, शिवाजी बिर्जे सह मोठ्या संख्येने शिक्षक उपस्थित होते. बहुसंख्य शिक्षकांनी संघटनेचे आजीव सभासदत्व स्वीकारले. यावेळी उपस्थित सर्वांसाठी कोवाड येथील सेवानिवृत्त शिक्षक प्रभाकर राजगोळकर यांनी चहापानची व्यवस्था केली.
No comments:
Post a Comment