मुंबई / विशेष वृत्तसेवा
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांच्या आदेशानुसार डिजिटल मिडिया परिषदेत आपण महाराष्ट्र राज्यातील जिल्ह्यांना राज्य कार्यकारिणी मध्ये प्रतिनिधित्व देणार असल्याचे मत डिजिटल मिडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे यांनी व्यक्त केले.
याबाबत पुढे बोलताना ते म्हणाले की, ``अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यभरात परिषदेचे जाळे निर्माण झाले आहे. महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या जिल्हा पत्रकार संघाच्या टिम सर्व क्षेत्रात कार्यरत आहेत. आम्ही सुद्धा डिजिटल मिडिया परिषद महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात निर्माण व्हावी म्हणून प्रयत्न करत आलो आहोत. राज्यातील ऐंशी टक्के जिल्ह्यात डिजिटल मिडिया परिषद ही मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली व विश्वस्त किरण नाईक, विश्वस्त शरद पाबळे, अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर यांच्या मार्गदर्शनाखाली युद्ध पातळीवर काम करत आहे.
येत्या २ जुलै रोजी मुंबई मध्ये अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने पुरस्कार वितरण सोहळा पार पडत आहे. या सोहळ्याला राज्यभरातील पत्रकार बांधव उपस्थित राहणार असुन सध्या या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात येत आहे. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचा हा महत्वपूर्ण कार्यक्रम असुन या सोहळ्याला तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार सह आदी मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र राज्यातील डिजिटल मिडिया परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या सोहळ्यात सहभागी होणे आवश्यक आहे.
या कार्यक्रमाच्या माध्यमातूनच आपला स्नेह वृद्धिंगत होण्यासाठी या भेटीत आपण महत्वपूर्ण विषयांवर चर्चा देखील करणार आहोत. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांच्या आदेशानुसार व विश्वस्त किरण नाईकर, विश्वस्त शरद पाबळे, अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, सरचिटणीस सुरेश नाईकवाडे, कोषाध्यक्ष शेख मन्सुरभाई यांच्या मार्गदर्शनाखाली आपण डिजिटल मिडिया परिषदेची राज्य कार्यकारिणी बळकट करण्यासाठी लवकरच काही राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यासाठी वरिष्ठांचे आदेश व मार्गदर्शन घेणार असल्याचे मत डिजिटल मिडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे यांनी व्यक्त केले.
No comments:
Post a Comment