![]() |
एस. बी. आय. च्या चंदगड शाखेत रक्तदान शिबीरासाठी उपस्थित ग्राहक. सोबत शाखाधिकारी मुकुंद मगदुम, रोकड अधिकारी सिद्धेश पिळणकर, बँक स्टॉफ अजय चंदनवाले व विजय कुंदेकर. |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाच्या चंदगड शाखेत बँकेचा ७० वा स्थापना दिवस व रक्तदान शिबीर कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. कोल्हापूर विभाग क्षेत्रीय व्यवस्थापक निशांत कुमार जायसवाल यांच्या मार्गदर्शनाखाली, चंदगड शाखेचे शाखाधिकारी मुकुंद बापुसो मगदूम, रोकड अधिकारी सिद्देश पिळणकर, बँक स्टाफ अजय चंदनवाले व विजय कुंदेकर यांनी हा कार्यक्रम उत्तमरीत्या राबविला.
देशातील अग्रगण्य असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेच्या चंदगड शाखेत आज बँकेचा ७० वा वर्धापनदिनानिमित्त रक्तदान शिबीर आयोजित केले होते.
![]() |
रक्तदान केल्यानंतर सर्टीफिकेट दाखवताना रक्तदाते |
या शिबीराला बँकेच्या ग्राहकांसह हितचिंतकांनी रक्तदान शिबीराला उपस्थिती लावत ६० हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले. एम. एस. आय. ब्लड बँक सेटर मिरजच्या टीमने या रक्तदात्यांकडून रक्तदान करुन घेवून पिशव्याचे संकलन केले. यामध्ये डॉ. अशोक देसाई, डॉ. किरण परगाने, सहाय्यक गायत्री क्षिरसागर, संतोष नांगरे व सागर पाटोळे यांच्या टीमने रक्तदान शिबीर पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.
यावेळी चंदगड बाजारपेठेतील व्यापारी वर्ग, विविध पतसंस्था, बँकांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी चंदगड शाखेच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment