ओलम शुगर यंदा ८ लाख टन गाळप उद्दिष्ट पूर्ण करणार, रोलर पूजन प्रसंगी संतोष देसाई यांचे प्रतिपादन - चंदगड लाईव्ह न्युज

26 June 2025

ओलम शुगर यंदा ८ लाख टन गाळप उद्दिष्ट पूर्ण करणार, रोलर पूजन प्रसंगी संतोष देसाई यांचे प्रतिपादन

राजगोळी खुर्द (ता. चंदगड) येथील ओलम कारखान्याच्या रोलर  पूजन प्रसंगी उपस्थित  मान्यवर
  

कोवाड : सी एल वृत्तसेवा

   राजगोळी (ता. चंदगड) येथील ओलम साखर कारखाना यंदा ८ लाख गाळप उद्दिष्ट पूर्ण करणार! असा विश्वास कारखान्याचे युनिट हेड संतोष देसाई यांनी व्यक्त केला. कारखान्याच्या सोळाव्या हंगामातील रोलर पूजन प्रसंगी ते बोलत होते. ओलमने शेतकऱ्यांचा विश्वास प्राप्त केला असून नेहमीप्रमाणे यंदाही शेतकरी आपला ऊस  ओलम (हेमरस) साखर कारखान्या ला पाठवतील त्यामुळे  यंदाही उच्चांकी गाळपाचे उद्दिष्ट आम्ही नक्कीच गाठू. असा विश्वास यावेळी देसाई यांनी व्यक्त केला.

    रोलरचे पूजन टेक्निकल हेड जयदीप जैन यांच्या हस्ते झाले. यावेळी केन हेड संग्राम पाटील, एचआर हेड महेश भोसले, फायनान्स हेड सुभाष दोरा, हेमरस यूनियन अध्यक्ष संताराम गुरव, एचआर रमेश पाटील, शेती विभागाचे अनिल पाटील व  गट प्रमुख तसेच इतर कर्मचारी व कामगार उपस्थित होते. सूत्रसंचालन संतोष गुरव यांनी केले. महेश भोसले यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment