आजरा / सी एल वृत्तसेवा
शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या तर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन सौ. धनश्री मानसिंगराव देसाई कोल्हापूर महिला जिल्हा प्रमुख शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष यांनी केले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रशांत साळुंखे संपर्कप्रमुख पश्चिम महाराष्ट्र शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. सुरजीत सुधाकर पांडव यांना शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आजरा तालुका प्रमुख पदी मंगेश चिवटे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख यांच्या सहीचे नियुक्तीचे पत्र देण्यात आले. त्याचबरोबर उमा संकपाळ यांना महिला तालुकाप्रमुख पदाची नियुक्ती देण्यात आली.
यावेळी आजरा येथील रक्तदात्यांनी उस्फूर्त प्रतिसाद देत रक्तदानासारखे महत्त्वाचे दान दिले. या कार्यक्रमाला विनायक जरांडे, जिल्हाप्रमुख निलेश पाटील, उपजिल्हाप्रमुख मानसिंग देसाई, सतीश पवार, हर्षवर्धन देसाई तसेच मोठ्या प्रमाणात शिवसेना कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभले.
No comments:
Post a Comment