![]() |
| महादेव सांबरेकर यांच्या सत्कार प्रसंगी पत्नी व गावच्या माजी सरपंच सौ शुभांगी सांबरेकर, मातोश्री, ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्य व ग्रामस्थ |
चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
माणगाव येथील सामाजिक कार्यकर्ते व खासदार धनंजय महाडिक यांचे निष्ठावंत कार्यकर्ते महादेव निंगाप्पा सांबरेकर यांची नुकत्याच पुनर्गठित झालेल्या चंदगड तालुका संजय गांधी निराधार योजना कमिटी सदस्य पदी निवड झाल्याने माणगाव व परिसरातील सर्वसामान्य नागरिकांत उत्साहाचे वातावरण दिसत आहे.
गरीबीतून वर आलेले, वेळी अवेळी लोकांच्या सेवेसाठी तत्परतेने पुढे येणारे, आपल्या सामाजिक कार्यामुळे स्वकर्तृत्वावर घडलेले व्यक्तिमत्व म्हणून महादेव सांबरेकर यांच्याकडे माणगाव पंचक्रोशीत पाहिले जाते. गेल्या काही वर्षांत अनेक राजकीय स्थित्यंतरे घडली तरी ते विद्यमान खासदार धनंजय महाडिक यांच्याशी एकनिष्ठ राहिले आहेत. त्याचे फळ त्यांना या निवडीच्या निमित्ताने मिळाले आहे. या निवडी मागे धनंजय महाडिक यांच्यासह आमदार शिवाजीराव पाटील यांची भूमिका ही महत्त्वाची ठरली असल्याचे समजते.
निवडीबद्दल सांबरेकर यांचा माणगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी सटुप्पा फडके यांनी महादेव सांबरेकर यांच्या सामाजिक व राजकीय कार्याचा आढावा घेऊन हे पद म्हणजे माणगावला मिळालेला "मान " आहे. त्याचा गोरगरीब व खऱ्या लाभार्थ्यांना अनुदान मिळवून देऊन त्यांचा आशीर्वाद घ्यावा अशी सदिच्छा व्यक्त केली. यावेळी प्रकाश नरी, उपसरपंच सुनिल सुरुतकर, माजी उपसरपंच बाबूराव दुकळे, ग्रा.पं. सदस्य संजय फडके, संदिप बेनके, सामाजिक कार्यकर्ते वैजू पिटूक, परसू नरी, महादेव कुंभार, सुशांत नौकुडकर, सुभाष होनगेकर, सदाशिव निट्टूरकर, कल्लाप्पा बेनके, उदय नौकुडकर, धनाजी सांबरेकर, महादेव बेनके, गजानन होनगेकर इ. मान्यवर उपस्थित होते.
महादेव सांबरेकर यांच्यापूर्वी माणगाव येथील येथील गुंडू मेटकुपी यांनी चंदगड तालुका संजय गांधी निराधार योजना कमिटीवर काम केले असून सांबरेकर हे माणगाव येथील दुसरे सदस्य ठरले आहेत.

No comments:
Post a Comment