![]() |
| मनोहर दत्ताजी पवार |
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
कुदनूर (ता. चंदगड) येथील रहिवाशी मनोहर दत्ताजी पवार (वय ८३) यांचे वृद्धापकाळ व अल्पशा आजाराने शुक्रवार दि. ७/११/२०२५ रोजी निधन झाले. ते कुदनूर येथील कामधेनू सहकारी दूध संस्थेचे माजी व्हा. चेअरमन होते. ग्राम पंचायत सदस्य सचिन पवार, कार्वे येथील महाविद्यालयाचे ग्रंथपाल संदीप पवार व कुदनूर येथील सिद्धेश्वर बेकर्सचे संचालक सुनील पवार यांचे ते वडील तर खेडूत शिक्षण मंडळ कालकुंद्री चे माजी अध्यक्ष लोकनेते कै तुकाराम दत्ताजी पवार यांचे कनिष्ठ बंधू होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी सकाळी होणार आहे.

No comments:
Post a Comment