सर्पमित्र सदाशिव पाटील यांनी दिले नाग सापाला जीवदान - चंदगड लाईव्ह न्युज

07 November 2025

सर्पमित्र सदाशिव पाटील यांनी दिले नाग सापाला जीवदान

 

हलकर्णी येथे पकडलेला भला मोठा नाग


तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

            हलकर्णी (ता. चंदगड) येथील अथर्व साखर उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मानसिंग खोराटे यांचे चालक श्री मुंगुर्डेकर यांच्या राहत्या घराला लागून तोडलेल्या झाडाच्या बुडक्यामध्ये प्रचंड मोठा नाग दिवसभर बिळात आत बाहेर करत होता. यामुळे घरातील लोक घाबरलेले होते. त्या झाडाच्या बुंध्याला  आग पेटवून बसले होते.

     मुंगूर्डेकर पुण्याला असल्यामुळे तेथूनच त्यांनी  सर्पमित्र सदाशिव पाटील यांना संपर्क साधून घरी जाऊन साप पकडण्याची विनंती केली. शेवटी संध्याकाळी ६ वाजता  जेसीबीच्या साह्याने तोडलेल्या झाडाचा बुंधा काढून त्यातील प्रचंड मोठा विषारी नाग सदाशिव पाटील यानी अत्यंत शिताफीने पकडला. यावेळी गावातील आबाल वृद्धांनी एकच एक गर्दी केली होती. साप पकडण्यासाठी त्यांना नागनवाडी हायस्कूलचे श्री गिरी व सर्पमित्र संदीप पाटील गुडेवाडी यांची मदत केली. सदरचा साप पकडून त्याला जीवदान देत सुरक्षित  जंगलात सोडण्यात आला.

No comments:

Post a Comment