चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
आमदार शिवाजीराव पाटील यांचे खंदे समर्थक व सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण विश्राम गावडे यांची संजय गांधी निराधार योजना समितीच्या चंदगड तालुकाध्यपदी नुकतीच निवड करण्यात आली. त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेवून त्यांची या पदासाठी निवड झाली आहे. त्यांच्या निवडीनंतर सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
संजय गांधी निराधार समितीत निवडल्या गेलेल्या अन्य सदस्यांत सौ. श्रीलक्ष्मी जाधव, महादेव सांबरेकर, भरमू पाटील, वैजनाथ हुसेनकर, जोतिबा गोरल यांची निवड करण्यात आली आहे. निवडीनंतर लक्ष्मण गावडे यांनी तळागाळातील लोकांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचविण्यासाठी नेहमी कार्यरत राहणार असल्याचे सांगितले.

No comments:
Post a Comment