अथर्व दौलत साखर कारखाना १२ नोव्हेंबर पासून बंद - चेअरमन मानसिंग खोराटे, पत्रकार परिषदेत दिली माहिती - चंदगड लाईव्ह न्युज

11 November 2025

अथर्व दौलत साखर कारखाना १२ नोव्हेंबर पासून बंद - चेअरमन मानसिंग खोराटे, पत्रकार परिषदेत दिली माहिती

 


चंदगड : सी. एल. वृत्तसेवा 

     अथर्व दौलतचे कामगार त्रिपक्षीय वेतन श्रेणी लागू करावी. या मागणीसाठी ठाम असून संपावर गेलेले कामगार आणि दौलत अथर्व प्रशासन यांच्यातील वाद अजून थांबलेला नाही. यातच मंगळवारी सकाळी दौलत अथर्व दौलतचे चेअरमन मानसिंग खोराटे यांनी पत्रकार परिषद घेऊन बुधवारी (दि. १२) पासून कारखाना बंद करत असल्याची घोषणा केली. 

    यावेळी ते म्हणाले, ``कारखाना बंद पाडावा यासाठी तालुक्यातील काही लोक सक्रिय आहेत. यातूनच त्यानी आपल्या ठराविक कामगारांना पुढे करत यंदाचा गाळप हंगामच होऊ द्यायचा नाही, असा निर्धार केला आहे, असे स्पष्ट होत आहे. ११ पैकी ९ मागण्या मान्य केल्या आहेत उर्वरित २ मागण्यावर नंतर सकारात्मक चर्चा करू, असे सांगितले. तरीही कामगाराकडून याला प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे कारखाना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 

    तसेच चंदगड तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी यांची जाहीर माफी मागून कारखाना बंद करत आहे. हाणामारी, तोडफोड, दगडफेक असे प्रकार मला पसंत नाहीत. कारखाना गळीत हंगामात आडकाठी आणणाऱ्या कडूनच दगडफेक आणि हाणामारीचे प्रकार घडत आहेत. या पुढील काळामध्ये असे प्रकार घडू नयेत, हीच माझी भावना आहे. तालुक्यात शांतता राहावी आणि असे प्रकार पुन्हा घडू नयेत, यासाठीच बुधवार दिनांक १२ नोव्हेंबर पासून अथर्व दौलत कारखाना बंद करण्याचा निर्णय घेत आहे.

No comments:

Post a Comment