चंदगड : सी एल वृत्तसेवा
चंदगड नगरपंचायत निवडणुकीसाठी सोमवारी दिनांक १० रोजी पहिल्या दिवशी एक अर्ज दाखल झाला नव्हता यानंतर दुसऱ्या दिवशी मंगळवारी दिनांक ११ इथे अर्ज दाखल झाला नाही. निवडणूक विभागातर्फे चंदगड तहसील कार्यालय येथे निवडणूक यंत्रणा कार्यरत आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार राजेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निवडणूक निर्णय निवडणूक निर्णय अधिकारी शेख यांच्या नियंत्रणाखाली निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे.
प्रभागानुसार या ठिकाणी ५ टेबल मांडण्यात आले आहेत यानुसार नगरसेवक व नगराध्यक्ष यासाठी स्वतंत्र अर्ज दाखल करून घेण्यात येत आहेत. आता यापुढे दि. १७ नोव्हेंबर या दरम्यान अर्ज दाखल होणार आहे तर १८ रोजी छाननी होणार आहे. यादरम्यान माजी आमदार राजेश पाटील व दिवंगत माजी मंत्री बाबासाहेब कुपेकर यांच्या कन्या डॉ. नंदाताई बाभुळकर या एकत्र आल्याची घोषणा सोमवारी झाल्यानंतर शहरात मोठ्या राजकीय घडामोडी होत आहेत. मोबाईल द्वारे नेत्यांना संपर्क चर्चा होत आहेत. बुधवारी दिनांक १२ रोजी काहीजण अर्ज दाखल करणार आहेत.

No comments:
Post a Comment