चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
म्हाळुंगे खालसा (ता. चंदगड) येथील इको केन शुगर एनर्जी लिमिटेड कारखान्याचा हंगाम सन २०२५-२६ चा केन कॅरीअर पूजा व काटा पूजन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी पूजेचा मान वेगवेगळ्या विभागातील कामगारांना देण्यात आला. कामगारांच्यामध्ये उत्साहाचे वातावरण होते.
वेळेवर बिल व योग्य वजन हे सूत्र यावर्षी प्रामुख्याने कारखान्यात राबिवली जाणार आहे. कारखान्याने आर्थिक नियोजन केलेले असून यामुळे वेळेवर ऊस बिल देण्यास मदत होईल. कारखान्यावर भागातील तसेच तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्रेम केलेले आहे. यामुळे मागील प्रत्येक हंगामात उचांकी गाळपाचा विक्रम कारखान्याने केला आहे. त्याचप्रमाणे यावर्षीही शेतकऱ्यांच्या प्रेमाच्या जोरावर कारखाना उचांकी असे ५ लाखाचा टप्पा पूर्ण करण्याचा मनोदय आहे. कारखाना हा फक्त साखर कारखाना असुन साखरे व्यतिरिक्त इतर कोणते उत्पादनाचे साधन नसताना देखील कारखान्याने नेहमीच इतर कारखान्यांच्या बरोबरीने दर दिला आहे समतोल राखला आहे.
कारखान्याचे केन कॅरीअर पूजन कार्यकारी संचालक सतीश अनगोळकर यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच काटा पूजन वाहतुकदार शिधप्पा कुंडल, बरचेवली नूरअहमद, शिवाजी पाटील, शिवाजी नेवगिरी, प्रवीण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले आहे. या वेळी कारखान्याचे व्यवस्थापक बाबासाहेब देसाई, चीफ इजिनियर मोहन सासणे, एच आर मॅनेजर सचिन पाटील, चीफ केमिस्ट विजायकुमार पाटील, शेती अधिकारी शशिकांत थोरवत, उपशेती अधिकारी सि. एस. हिरेमेठ, सत्यजित सावंत, सचिन बेनके, सचिन अष्टेकर शेती विभागाचे सुपवाईजर महेश कदम, शाम अवडण, पुंडलीक बीर्जे, महेंद्र परिषवाड, मारुती कदम हे उपस्थित होते.

No comments:
Post a Comment