![]() |
| न्यू इंग्लिश स्कूल, चंदगडच्या १९८७-८८ च्या बँचचे स्नेहमेळाव्यानिमित्त एकत्र आलेले विद्यार्थ्यी. |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
न्यू इंग्लिश स्कूल, चंदगडच्या १९८७-१९८८ च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आसगाव (ता. चंदगड) येथील निसर्गरम्य वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेतील जुने विद्यार्थी तब्बल ३५ वर्षांनंतर एकत्र येत जुन्या आठवणींना उजाळा दिला. या भेटीत भावनिक क्षण, हसरे प्रसंग आणि मैत्रीचा उबदारपणा सर्वांना अनुभवायला मिळाला.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात राजाराम सुकये यांनी “मैत्रीचा ओलावा टिकवायचा असेल तर दरवर्षी अशा स्नेहमेळाव्यांतून आपण एकत्र येत राहिले पाहिजे. फक्त आनंदाच्या क्षणीच नव्हे, तर दुःखाच्या वेळीही मित्रांनी एकमेकांना साथ दिली पाहिजे.त्यांच्या या विचारांनी उपस्थित सर्व मित्रांना भावनिक केले.``
कार्यक्रमा दरम्यान तुकाराम मस्कर, महेश फाटक, राजाराम सुकये आणि केतन देशपांडे यांनी आपले गायन सादर करून शाळेच्या दिवसांच्या गोड आठवणींना उजाळा दिला. त्यासह सुधाकर गावडे, संतोष देसाई, महादेवराव वांद्रे, राजन वाली, संजय राजपूत, बळीराम पाटील यांनी मनोगते व्यक्त करत मैत्री आणि सहकार्याचा संदेश दिला.
कार्यक्रमाच्या शेवटी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले. जुन्या मित्रांबरोबर घेतलेला हा भोजनाचा आनंद आणि हास्याचा माहोल सर्वांच्या चेहऱ्यावर झळकत होता.
या स्नेहमेळाव्यात राजेंद्र भिसे, संभाजी देसाई, सुरेश साळुंखे, रवी बुरुड, रामचंद्र ओऊळकर, सुहास पवार, अशोक झेंडे, संदीप घेवडे, पुंडलिक किरमटे, वसंत काणेकर, अरुण जामदार, आदम नाईकवाडी, डॉक्टर संतोष देसाई, यशवंत पाटील, बळीराम पाटील, अतुल दाणी, गुरुनाथ बल्लाळ, दिलीप रेवडेकर, प्रदीप बल्लाळ यांच्यासह अनेक माजी विद्यार्थी उपस्थित होते.या स्नेहमेळाव्यातून एक गोष्ट स्पष्ट झाली की शाळा संपली तरी मैत्री संपत नाही.
जीवनाच्या धकाधकीतही आपलेपणाचा धागा जपणारी अशी मैत्री हीच खरी संपत्ती आहे. आसगावच्या शांत निसर्गात गप्पा, गाणी आणि आठवणींनी रंगलेला हा स्नेहमेळावा म्हणजे “भूतकाळाशी जुळलेलं भावनिक नातं”ज्याने पुन्हा एकदा दाखवून दिलं की, शाळेतील मित्र म्हणजे आयुष्यभराची ताकद!

No comments:
Post a Comment