अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती चंदगडचे तालुकाध्यक्ष बापूसाहेब शिरगावकर यांच्या शिफारशीनुसार तालुका कार्यकारणीची निवड कोल्हापूर येथे महाराष्ट्र राज्य पदाधिकारी व कोल्हापूर जिल्हा पदाधिकारी यांनी केली.
चंदगड तालुका कार्यकारणी खालील प्रमाणे...........
बापूसाहेब शिरगावकर (तालुकाध्यक्ष) विठ्ठल कोठारी उपाध्यक्ष व कानूर विभाग प्रमुख, सुरेश दळवी (सचिव व पाटणे विभाग प्रमुख), विलास कुमार विंजणेकर (नागनवाडी विभाग प्रमुख), संजीत मटकर (अडकूर विभाग प्रमुख), मनोज कांबळे (हलकर्णी विभाग प्रमुख), सुरेश गावडे (तुडये विभाग प्रमुख), ज्ञानेश्वर गावडे (उपविभाग प्रमुख कानूर), रणजीत गावडे (उपविभाग प्रमुख कानूर), प्रताप डसके (विभाग प्रमुख कोवाड) या सर्वांना वरील कार्यक्रमात नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.
यावेळी मुख्य कार्यकारी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य धीरज रुकडे व जिल्हा अध्यक्ष कयेश पवार यांनी नियुक्तीपत्रे व आय डी प्रधान केल्या. यावेळी जिल्हा मुख्य कार्यकारी अध्यक्ष विपुल कांदेकर, जिल्हा उपाध्यक्ष अनिरुद्ध कुलकर्णी, जिल्हा सचिव सचिन बांदेकर, शहराध्यक्ष सलमान पठाण, हातकणंगले तालुका अध्यक्ष इमरान मोमीन, धनंजय सराटे व गणेश पाटील उपस्थित होते.
यावेळी महाराष्ट्र मुख्य कार्यकारी अध्यक्ष धीरज रुकडे म्हणाले, भ्रष्टाचार अगदी तळागाळापर्यंत पोहोचला आहे आणि हा मोडून काढणे व भ्रष्टाचाराच्या विरोधात लढा उभारणे. हे आपले कार्य असून या कार्यात सर्व पदाधिकाऱ्यांनी झोकुन देऊन काम करावे. भ्रष्टाचाराचा समुळ नायनाट करून सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी झटावे अशी अपेक्षा व्यक्त केली.`` भ्रष्टाचार ही आपल्या देशाला लागलेली कीड आहे आणि तिचा नायनाट करणे आवश्यक आहे अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. चंदगड तालुका समिती या कार्यात प्रामाणिकपणे काम करून सर्वसामान्यांना न्याय देईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. जिल्हाध्यक्ष महेश पवार यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी चंदगड तालुका नूतन समितीला शुभेच्छा दिल्या.
.jpeg)
No comments:
Post a Comment