चंदगड : माडखोलकर महाविद्यालयात राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

12 November 2025

चंदगड : माडखोलकर महाविद्यालयात राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

    येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयात राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. खेडूत शिक्षण मंडळाचेसंस्थापक सदस्य व माजी चेअरमन स्व. र. भा. माडखोलकर यांच्या शंभराव्या स्मृती दिना निमित्त या स्पर्धा संपन्न होत आहेत. शुक्रवार दि. २८ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ठीक १०.३० ला महाविद्यालयाच्या स्भागृहातसदरची स्पर्धा सुरु होईल. 

स्पर्धेसाठीपुढील प्रमाणे विषय आहेत..........

    १. नवे तंत्रज्ञान व बदलती आव्हाने. २. कुणाच्या डोक्यात? शेती धोक्यात? ३. ब्रेकिंगच्या गदारोळात पत्रकारितेची हत्या. ४. स्व.र.भा. माडखोलकर सरांचे सामाजिक व शैक्षणिक योगदान. ५. अभिजात मराठी भाषा माझा अभिमान.स्पर्धेसाठी अनुकमेरुपयेपाच हजार, चार हजार, तीन हजार वएक हजाराची दोन उत्तेजनार्थ बक्षीसे आहेत. शुक्रवार दि. २८ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ठीक १०.३० ला महाविद्यालयाच्या स्भागृहातसदरची स्पर्धा सुरु होईल. प्रवेश शुल्क रुपये पन्नास इतके असेल. या स्पर्धेत सर्वांनी सहभाग घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्र. प्रा. प्रा. डॉ. एस. डी. गोरल व समन्वयक प्रा. एस. व्ही. कुलकर्णी यांनी पत्रकाद्वारे केले आहे.

No comments:

Post a Comment