चंदगड नगरपंचायत निवडणूकीत १७ प्रभागात दि. १४ रोजी ८ तर एकूण १२ जणांचे उमेदवारी अर्ज दाखल - चंदगड लाईव्ह न्युज

14 November 2025

चंदगड नगरपंचायत निवडणूकीत १७ प्रभागात दि. १४ रोजी ८ तर एकूण १२ जणांचे उमेदवारी अर्ज दाखल

  


चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

   चंदगड तालुक्यात एकमेव असलेल्या चंदगड नगरपंचायतची दुसरी सार्वत्रिक निवडणूक २०२५ जाहीर झालेली असून उमेदवारी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आजच्या चौथ्या दिवशी ८ उमेदवारांनी आपली उमेदवारी दाखल केली. यात प्रभाग क्रमांक ६ आझाद गल्ली येथून शानूर मोहम्मदअली पाच्छापुरी, प्रभाग ८ गुरुवार पेठ चंदगड येथून जयश्री संतोष वनकुद्रे, प्रभाग १० रवळनाथ गल्ली येथून सुनिता सुशील हळवणकर व प्रियांका सतीश परीट, प्रभाग ३ नवीन वसाहत मधून आनंद मारुती हळदणकर, प्रभाग १५ नगरपंचायत समोर मधून प्रसाद गणपती वाडकर, प्रभाग ५ पप्पू कॉलनी/ बेळगाव रोड येथून मोहम्मदअली इस्माईल नाईक, प्रभाग १६ ब्राह्मण गल्ली येथून शितल रामनाथ गुळामकर आदींनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. 

       याशिवाय काल दिनांक १३ नोव्हेंबर रोजी प्रभाग ११ मधून मनोहर कृष्णा गडकरी प्रभाग १० मधून सरिता संतोष हळदणकर, प्रभाग १ मधून पूनम प्रदीप फडते, प्रभाग ९ मधून अनुसया श्रीकृष्ण दाणी यांनी आपले उमेदवारी अर्ज भरले आहेत. सोमवार दिनांक १७ रोजी उमेदवारी नामनिर्देशन भरण्याची अंतिम तारीख आहे.

No comments:

Post a Comment