चंदगड / सी एल वृतसेवा
अनगोळ रोड, स्मार्ट बाजार समोर, टिळकवाडी येथील नेत्रदर्शन सुपर स्पेशलिटी डोळ्यांचे हॉस्पिटल युनिट ऑफ डॉक्टर अग्रवाल यांच्यावतीने मंगळवारी (दि. 18) मधुमेह रुग्णांसाठी मोफत डोळ्यांचा पडदा (रेटिना) तपासणी शिबिर व मोफत रक्तदाब, मधुमेह तपासणी शिबिर होणार आहे. सकाळी नऊ ते दुपारी तीन या दरम्यान सदर शिबिर होणार असून बेळगाव व परिसरातील गावातील रुग्णांनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. सचिन माहुली, डॉ. अल्पेश टोपराणी, डॉ. जगदीश पाटील, डॉ. अवधूत वाघळे यांनी केले आहे. हे शिबिर फक्त मधुमेह रुग्णांसाठी आहे.

No comments:
Post a Comment