चंदगड वनविभागाचे कर्मचारी रान गव्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी, उपचारासाठी हलविले केएलई हॉस्पीटल बेळगांव येथे - चंदगड लाईव्ह न्युज

27 December 2025

चंदगड वनविभागाचे कर्मचारी रान गव्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी, उपचारासाठी हलविले केएलई हॉस्पीटल बेळगांव येथे

शंकर सखाराम सुखये

संपत पाटील, चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        कानुर बुद्रुक (ता. चंदगड) पैकी बामणकीवाडी ते नांदुरे हद्दीलगत संजय पाटील यांच्या मालकीच्या क्षेत्रात आक्काचा आळा येथे गव्याने केलेल्या हल्यात वनविभागाचे शंकर सखाराम सुखये (कायम वनमजुर कानुर खुर्द, मुळ गाव- बुझवडे ता. चंदगड) यांना गंभीर जखमी केले. शुक्रवारी दि. २६ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३.३० ते ४ च्या दरम्यान मुदतीत हि घटना घडल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे. 

यासंदर्भात वनविभागाकडून मिळालेली माहीती अशी की, दि. २६/१२/२०२५ रोजी सकाळी ९.३० वा कानुर खुर्द येथुन तेथील स्थानिक ग्रामस्थांनी गवा आल्याची माहिती वनविभागाला दिली. या माहितीनुसार कानूर बु पैकि बामणकीवाडी ते नांदुरे हद्दी लगत संजय पाटील यांचे मालकी क्षेत्रात ``आक्काचा आळा`` या स्थानिक नावे ओळखल्या जाणाऱ्या क्षेत्रामध्ये वन्यप्राणी गवा असलेचे समजले. 

    या माहीतीनुसार परिमंडळ वन अधिकारी कानुर खुर्द व त्यांचे कार्यालयाकडील अधिकारी कर्मचारी तसेच आर. आर. टी. टीम समवेत घेऊन जागेवर जावुन पाहणी केली असता सदरचे क्षेत्र दाट झाडा झुडपाचे होते. वन्यप्राणी गवा सदर क्षेत्रात कोठे आहे, याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केले असता अचानक झुपामधुन येऊन वनविभागाचे शंकर सखाराम सुखये (कायम वनमजुर कानुर खुर्द, मुळ गाव - बुझवडे ता. चंदगड) यांना गंभीर जखमी केले.

    या बाबतची माहिती चंदगडचे वनक्षेत्रपाल तुषार गायकवाड यांना मिळताच कर्मचारी यांचे समवेत घटनास्थळी पोहचुन शासकिय वाहनातुन श्री. सुखये यांना  प्राथमिक उपचारासाठी चंदगड येथील ग्रामीण रुग्णांलयात दाखल केले. या ठिकाणी त्यांच्यावर प्राथमिक उपचार करुन दुखापत गंभीर असलेने पुढील उपचारासाठी केएलई हॉस्पीटल बेळगांव येथे दाखल करणेत आले असुन त्यांची तब्येत स्थिर आहे. 

    वनक्षेत्रपाल चंदगड श्री. तुषार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल कानुर खुर्द व वनरक्षक कानुर खुर्द यांनी घटनास्थळाची पाहणी करुन पंचानामा केला.

No comments:

Post a Comment