अडकूर जिल्हा परिषद मतदार संघातील कोकरे येथे उमेदवार सौ. अलकनंदा पाटील व गवसे पं. स. उमेदवार सौ. रेणुका कांबळे यांच्या प्रचारार्थ निखिल राजेश पाटील यांचा प्रचार - चंदगड लाईव्ह न्युज

05 February 2026

अडकूर जिल्हा परिषद मतदार संघातील कोकरे येथे उमेदवार सौ. अलकनंदा पाटील व गवसे पं. स. उमेदवार सौ. रेणुका कांबळे यांच्या प्रचारार्थ निखिल राजेश पाटील यांचा प्रचार

कोकरे (ता. चंदगड) येथे राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचार करताना निखील राजेश पाटील व ब्लॅक पँथर पक्षाचे नेते सुभाष देसाई व कार्यकर्ते 

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        अडकूर जिल्हा परिषद मतदारसंघातील कोकरे (ता. चंदगड) येथील गावात जिल्हा परिषद उमेदवार सौ. अलकनंदा पाटील व गवसे पंचायत समिती उमेदवार सौ. रेणुका कांबळे यांच्या प्रचारार्थ निखिल राजेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रचारफेरी काढण्यात आली. 

    या प्रचारफेरी दरम्यान निखिल राजेश पाटील यांनी गावातील नागरिकांशी थेट संवाद साधत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विकासात्मक धोरणांची माहिती दिली. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून गावागावातील मूलभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण व महिला सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या योजना त्यांनी उपस्थितांपुढे मांडल्या. कोकरे गावातील नागरिकांनी या प्रचारफेरीला उपस्थित राहून उमेदवारांना भरभरून पाठिंबा दर्शविला. गावकऱ्यांचा उत्साह आणि विश्वास पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला या मतदारसंघात निश्चितच भक्कम यश मिळेल, असा विश्वास निखिल राजेश पाटील यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांच्यासोबत ब्लॅक पँथर पक्षाचे नेते सुभाष देसाई व कार्यकर्ते प्रचारात सक्रीय होते. 

No comments:

Post a Comment