शिवसंत संजय मोरे यांना मातृशोक, श्रीमती सावित्री मोरे यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

28 September 2026

शिवसंत संजय मोरे यांना मातृशोक, श्रीमती सावित्री मोरे यांचे निधन

श्रीमती सावित्री मोरे
बेळगाव : सी एल वृत्तसेवा 

           राकसकोप (ता. बेळगाव) येथील रहिवाशी श्रीमती सावित्री रुक्माना मोरे यांचे गुरुवार, दि. २४ सप्टेंबर २०२६ रोजी वयाच्या ९५ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.

     अखिल भारतीय मराठा जागृती मंच पानिपत चे कर्नाटक राज्य समन्वयक, महाराष्ट्र- कर्नाटक सीमा लढ्याचे अग्रणी, सुप्रसिद्ध उद्योजक, कॉलेज रोड बेळगाव येथील यश ऑटो (महिंद्रा) चे संचालक, शिवसंत संजय मोरे यांच्या त्या मातोश्री होत. पानिपत हरियाणा येथे मराठा जागृती मंच पानिपत च्या माध्यमातून होणाऱ्या  तसेच आग्रा (उत्तर प्रदेश) येथे गरुड झेप मोहीम अंतर्गत दरवर्षी होणाऱ्या शिव चातुर्य दिन आदी ऐतिहासिक कार्यक्रम यशस्वीतेसाठीही  शिवसंत संजय मोरे यांचा नेहमी पुढाकार असतो.

     श्रीमती सावित्री मोरे यांच्या पश्चात चिरंजीव रामलिंग मोरे, निवृत्त सुभेदार अरुण मोरे व शिवसंत संजय मोरे, कन्या मंजुळा ढेगसकर यांच्यासह सुना, नातवंडे, पणतवंडे असा मोठा परिवार आहे. रक्षा विसर्जन विधी दि. २८ सप्टेंबर २०२६ रोजी राकसकोप व श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे करण्यात आला.

   मातोश्री श्रीमती सावित्री मोरे यांना अखिल भारतीय मराठा जागृती मंच पानिपत, चंदगड तालुका पत्रकार संघ व आग्रा ते राजगड गरुड झेप मोहीम यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली...!

No comments:

Post a Comment