![]() |
| विजय पिळणकर |
चंदगड : सी एल वृत्तसेवा
मुळचे चंदगड व सध्या मिनर्वा कॉलनी, आजरा येथील रहिवासी तसेच महाराष्ट्र राज्याच्या पशुवैद्यकीय खात्याचे निवृत्त ड्रेसर विजय धोंडीबा पिळणकर (वय ७६) यांचे अल्पशा आजाराने मंगळवारी दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, तीन मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. चंदगड येथील स्टेट बँक शाखेचे कॅशियर सिद्धेश पिळणकर यांचे ते वडील व आजरा येथील आजरा जूनियर कॉलेजच्या प्रा. रूपाली पिळणकर यांचे ते सासरे होत. चंदगड येथील उत्कर्ष गणेश मंडळाचे माजी अध्यक्ष व नगरपंचायतचे नगरसेवक सुधीर पिळणकर यांचे ते काका होत. त्यांच्या निधनामुळे चंदगड व आजरा शहरातून सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.

No comments:
Post a Comment