गडहिंग्लज : सी एल वृत्तसेवा
महाराष्ट्र राज्य योगशिक्षक संघ यांच्या वतीने नुकत्याच धुळे येथे महायोगोत्सव अंतर्गत घेण्यात आलेल्या योगासन स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्याचा दबदबा पहायला मिळाला. संपूर्ण स्पर्धेत कोल्हापूर जिल्हा आघाडीवर राहिला. याचे कारण म्हणजे योग विद्या धाम गडहिंग्लज च्या साधकांनी केलेली कौतुकास्पद कामगिरी. स्पर्धेत गडहिंग्लजच्या योग केंद्रातील तिघांनी विविध गटात प्रथम क्रमांक पटकावले.
योग विद्या धाम गडहिंग्लज केंद्रातील यश मिळवलेले साधक पुढीलप्रमाणे- डॉ. संजय सिद्धाप्पा चौगुले (७४.७५ गुण) ४५ ते ५५ वयोगटात प्रथम क्रमांक, सौ गीतांजली धोंडीराम पाटील (७२.७५ गुण) ६५ वर्षावरील गटात प्रथम क्रमांक, संदीप शंकरराव कागवाडे ५५ ते ६५ वयोगटांमध्ये द्वितीय क्रमांक ७१.५ गुण.
स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण धुळे येथे १४ व १५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या महायोगोत्सव कार्यक्रमात होणार आहे. एकाच योग केंद्राने इतकी पारितोषिके पटकावत लक्षवेधी कामगिरी केल्याने पारितोषिके मिळाल्याने योग विद्या धाम गडहिंग्लज चे सर्वत्र कौतुक होत आहे.
विशेष म्हणजे या विजेत्यांपैकी ६५ वर्षांवरील गटात प्रथम क्रमांक पटकावलेल्या गीतांजली पाटील यांनी नुकत्याच हाँगकाँग येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय योगासन स्पर्धेतही रौप्य पदक पटकावले होते. त्यांनी अनेक वर्षे चंदगड तालुक्यात जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षिका म्हणून काम केले असून श्री गणेश प्राथमिक विद्यामंदिर निट्टूर शाळेतून त्या मुख्याध्यापिका म्हणून सेवानिवृत्त झालेल्या आहेत. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी योग साधना करत सर्वांसमोर शारीरिक तंदुरुस्तीचे आदर्श उदाहरण घालून दिले आहे.

No comments:
Post a Comment