अडकूर येथील रस्सीखेच स्पर्धेत कालकुंद्री संघ अजिंक्य - चंदगड लाईव्ह न्युज

17 October 2026

अडकूर येथील रस्सीखेच स्पर्धेत कालकुंद्री संघ अजिंक्य


चंदगड : सी. एल. वृत्तसेवा 

       खास नवरात्रोत्सवानिमित्त अडकूर (ता. चंदगड) येथील श्री महालक्ष्मी क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या खुल्या रस्सीखेच स्पर्धेत कालकुंद्री (ता. चंदगड) येथील श्री कल्मेश्वर मंडळांने अजिंक्यपद पटकावले. या स्पर्धा गुरुवार दिनांक १५/१०/२०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक अडकूर येथे पार पडल्या. स्पर्धेचे उद्घाटन व बक्षीस वितरण संग्रामदादा अडकुरकर यांच्या हस्ते झाले. यावेळी मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. 

       विविध भागातून आलेल्या तुल्यबळ अकरा संघांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. अंतिम लढत अडकूर विरुद्ध कालकुंद्री अशी झाली. यात कालकुंद्री संघाने एकतर्फी बाजी मारली. विजेत्या संघात रणजीत मारुती कांबळे, संदीप दत्तात्रय कांबळे, भरत वाकोजी मुंगुरकर, विनायक महादेव खवणेवाडकर, संदीप लक्ष्मण पाटील, विशाल विठ्ठल कांबळे, राहुल बाबू कांबळे या खेळाडूंचा समावेश होता. विजेत्या संघाला मोहन नाईक, परसू सत्यापा, नाईक यल्लाप्पा रमेश पाटील, किरण नरसू पाटील, रोहन पुंडलिक पाटील यांचे सहकार्य लाभले. या विजेत्या संघाने नुकत्याच नेसरी येथे पार पडलेल्या स्पर्धेतही यश मिळवले होते. विजेत्या संघाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment