स्त्रीचा सन्मान हाच खरा दुर्गापूजेचा उत्सव -संजय साबळे, कुर्तनवाडीत हळदी-कुंकू कार्यक्रम उत्साहात - चंदगड लाईव्ह न्युज

20 October 2026

स्त्रीचा सन्मान हाच खरा दुर्गापूजेचा उत्सव -संजय साबळे, कुर्तनवाडीत हळदी-कुंकू कार्यक्रम उत्साहात

 


चंदगड / सी एल वृत्तसेवा

"मंदिरातील देवीच्या पूजेसोबतच घरातील स्त्रियांचाही सन्मान आणि आदर करणे आवश्यक आहे. स्त्रीमध्ये अनेक संकटांचा सामना करण्याची प्रचंड क्षमता असते. तसेच संस्कारक्षम आणि सुसंस्कृत पिढी घडविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य स्त्रीच करू शकते. त्यामुळे स्त्रीचा सन्मान करणे हीच खरी दुर्गापूजा आहे,"असे प्रतिपादन सुप्रसिद्ध वक्ते संजय साबळे यांनी केले.

कुर्तनवाडी येथे दुर्गादेवी उत्सव मंडळाच्या वतीने आयोजित हळदी-कुंकू कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी त्यांनी स्त्रीचे कुटुंबातील स्थान, समाजाच्या जडणघडणीतील तिचे योगदान आणि स्त्रीसन्मानाचे महत्त्व याविषयी आपले वियाविषयी आपले विचार मांडले.

संजय साबळे म्हणाले की, " स्त्रीला शक्तीस्वरूप मानले जाते.. नवरात्रोत्सवात आपण मोठ्या भक्तिभावाने दुर्गादेवीची पूजा करतो; मात्र प्रत्यक्ष . जीवनातही महिलांना सन्मानाची वागणूक देणे तितकेच महत्त्वाचे आहे. स्त्री ही कुटुंबाचा आधार असून, मुलांवर संस्कार करण्यापासून ते समाजाच्या विकासात योगदान देण्यापर्यंत तिची भूमिका अत्यंत मोलाची आहे. महिलांचा आदर, त्यांना समान संधी आणि त्यांच्या कार्याची दखल घेणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. "

स्त्रीशक्तीचा गौरव आणि महिलांच्या सन्मानाचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमातून सामाजिक जाणीव अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. मनीषा माडखोलकर यांनी केले. यावेळी अशोक चांदेकर, भिकू माडखोलकर, मालन चौकूळकर, अश्विनी चांदेकर यांच्यासह ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दौलत चांदेकर यांनी केले, तर कांचन चांदेकर यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment